New Bhartiya General Kamgar Union

Reg. No. K.U.A/THANE/ 1997/2022 Maharashtra

Testimonials

मनोगत

सशक्त, आनंदी आणि स्वावलंबी भारताच्या स्वप्नात कामगारांच्या समक्षिकरणाची गरज आहे. स्वातंत्र्याचा ७५  वर्षानंतरही सुमारे ९० टक्के कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. ज्यांना  सर्व सामाजिक सुरक्षा सुविधा मिळत नाहीत. देशात संघटित आणि असंघटित क्षेत्रातील  कामगार वर्गाची संख्या ५० कोटींहून अधिक आहे. संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची सौरक्षण आणि संवर्धन हे आमच्या न्यू भारतीय जनरल कामगार यूनियन चे उद्दिस्ठ आहे.

आमचे संघटन कायद्यांच्या जाळ्यात अडकलेल्या कामगार वर्गाला, आर्थिक शोषणचे शिकार व शोषित पीडित मजुरांना न्याय् मिळवून देण्याचे दिशेने क्रांतिकारी पाऊल घेऊन मजूर कामगारांना खरे स्वतंत्र देण्याचे दिशेने कार्याकरत आहे.

तसेच केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे विविध योजनांचे लाभ कामगारांना मिळवून देणे, श्रमिक वर्गाचे सुरक्षितता, आरोग्य आणि विविध सुविधा कामगार वर्गास मिळवून देणे या उद्दिष्टाने सदर दिशेने कार्यरत आहे.

 

श्री. संजय बुधन प्रजापति.

       (अध्यक्ष)