Reg. No. K.U.A/THANE/ 1997/2022 Maharashtra
श्री.संजय बुधन प्रजापती.
श्री.सुनील रामधनी प्रजापती.
महाराष्ट्र राज्यात न्यू भारतीय जनरल कामगार यूनियन, श्रमिक संघ अधिनियम १९२६ नुसार संघटनेने ११ एप्रिल २०२२ रोजी खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे न्यू भारतीय जनरल कामगार यूनियन ची स्थापना केली आहे. संघटनेतर्फे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. संघटनेची महाराष्ट्र राज्यात खारघर, नवी मुंबई ,महाराष्ट्र येथे एकच केंद्रीय कार्यालय आहेत.
आरोग्य, शिस्त, सेवा, सुधार, समृद्धी.
महाराष्ट्रातील नोंदणीकृत तसेच असंघटित कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे दर्जेदार कल्याणकारी योजना, कार्यक्रम व सुविधा पुरवून, जीवनमान उंचावणे. त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व मानसिक उन्नती घडविणे. तसेच शोषित पीडित कामगारास कायद्याअंतर्गत न्याय् मिळवून देणे.
न्यू भारतीय जनरल कामगार यूनियन मार्फत, असंघटित क्षेत्रात तसेच संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजूर कामगारास महाराष्ट्र राज्य शासनाचे कामगार विभागाकडून मिळणारे सर्व सुविधान पर्यंत पोहोचण्याकरीता मोलाचे सहकार्य करतो. तसेच असंघटित क्षेत्रात काम करनाऱ्या कामगारास (महाराष्ट्र मंडळा मध्ये नोंदणी कार्ड) अर्थात BOCW मध्ये नोंद करण्याकरिता जनजागृती मोहीम राबवतो.
शोषित पीडित कामगारास कायद्याअंतर्गत न्याय् मिळवून देणे. संघटनेमार्फत असंघटित क्षेत्रात तसेच संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजूर कामगारास महाराष्ट्र राज्य शासनाचे कामगार विभागा कडून मिळणारे सर्व सुविधान पर्यंत पोहचवण्याकरीता मोलाचे सहकार्या करने, तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारास BOCW मध्ये नोंद करून देणे. कामा-दरम्यान दुर्घटना ग्रस्त आजारी किंवा मयत झालेली कामगारास किंवा त्यांचा कुटुंबियांस नुकसान भरपाई मिळवून देण्यास सहकार्या करणे इत्यादि.
सशक्त, आनंदी आणि स्वावलंबी भारताच्या स्वप्नात कामगारांच्या समक्षिकरणाची गरज आहे. स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतरही सुमारे ९० टक्के कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. ज्यांना सर्व सामाजिक सुरक्षा सुविधा मिळत नाहीत. देशात संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गाची संख्या ५० कोटींहून अधिक आहे. संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची सौरक्षण आणि संवर्धन हे आमच्या न्यू भारतीय जनरल कामगार यूनियन चे उद्दिस्ठ आहे.
आमचे संघटन कायद्यांच्या जाळ्यात अडकलेल्या कामगार वर्गाला, आर्थिक शोषणचे शिकार व शोषित पीडित मजुरांना न्याय् मिळवून देण्याचे दिशेने क्रांतिकारी पाऊल घेऊन मजूर कामगारांना खरे स्वतंत्र देण्याचे दिशेने कार्याकरत आहे.
तसेच केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे विविध योजनांचे लाभ कामगारांना मिळवून देणे, श्रमिक वर्गाचे सुरक्षितता, आरोग्य आणि विविध सुविधा कामगार वर्गास मिळवून देणे या उद्दिष्टाने सदर दिशेने कार्यरत आहे.
श्री. संजय बुधन प्रजापति.
(अध्यक्ष)