Reg. No. K.U.A/THANE/ 1997/2022 Maharashtra
महाराष्ट्र राज्यात न्यू भारतीय जनरल कामगार यूनियन, श्रमिक संघ अधिनियम १९२६ नुसार संघटनेने ११ एप्रिल २०२२ रोजी खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे न्यू भारतीय जनरल कामगार यूनियन ची स्थापना केली आहे. संघटनेतर्फे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. संघटनेची महाराष्ट्र राज्यात खारघर, नवी मुंबई ,महाराष्ट्र येथे एकच केंद्रीय कार्यालय आहेत.
न्यू भारतीय जनरल कामगार यूनियन हे, श्रमिक कामगारांचा सुरक्षा कवच या घोष वाक्याने प्रेरित होऊन राज्यात कार्य करत आहे. संघटने द्वारे राबवण्यात येत असलेली सर्वे योजना हे थेट कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविल्या जातात. सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० ही न्यू भारतीय कामगार यूनियन कार्यालयाची कामकाजाची वेळ आहे. सार्वजनिक सुट्टी, आणि दर रविवारी संघटनाचे कार्यालय बंद असतात. संघटनेचे अध्यक्ष हे संघटनेचे प्रमुख आहेत.
संघटन दर महिन्याला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मजूर कामगारांना आपल्या संघटनेत सदस्य पदावर नियुक्ती करते. यात कामगार, मालक, महिला आणि स्वतंत्र प्रतिनिधींचा समावेश असतो. संघटनेची दर २ महिन्यांनी किमान एक बैठक होते. संघटनेचा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संघटन प्रमुख या नात्याने संघटन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांची असते.
संघटनेचे अध्यक्ष – संजय बुधन प्रजापति, जन्म तारीख – ०२ मार्च १९८४, जन्म स्थान – राज्य उत्तर प्रदेशातील, जिल्हा- गोरखपुर व तहसील- बास गाव, थाना- गगहा, पोस्ट- शिवपूर येथील ग्राम मजुरी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांचा प्राथमिक शिक्षण हे ग्राम मजुरी येथील प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता – १ ते ५ वी पर्यंत आणि इयत्ता – ६ ते ८ वी पर्यंतचे शिक्षण जनता इंटर कॉलेज मजुरी येथे पूर्ण केली आहे. आणि कौटुंबिक परिस्थिति विकट असल्या कारणाने शिक्षणा दरम्यान त्यानी त्यांची कौटुंबिक व्यवसायात हाथभार लावली, त्यांचे वडील हे कुंभार समाजाचे होते. मातीची भांडी, हांडी, खेळणी आणि इतर सामग्री (वस्तु) बनवणे हे त्यांचे पारंपरिक व्यवसाय आहे. आणि त्यातून त्यांचे कुटुंबियांचे उदरनिर्वाह होत असे.
वर्ष -१९९७ साली, जून महिन्यात ते उत्तर प्रदेशातून मुंबईत आले. आणि त्यांचा मोठ्या भावा सोबत कामाठीपुरा ७ वी गल्ली, सदर ठिकाणी फूटपाठ वर हाथ गाडीवर वडापावचे व्यवसाय सुरू केले. सदर व्यवसाय हे वर्ष- १९९७ ते २००० पर्यंत केले. त्यानंतर त्यांनी वर्ष २००१ रोजी व्यवसायात बदल करत त्यांनी बांधकाम क्षेत्रात लादी कडियाचे आणि बांधकाम प्लसटर (राजमिस्त्री) चे काम करण्यास सुरू केले. व सदर क्षेत्रात त्यांनी वर्ष २००१ ते २००७ पर्यंत लादी काडियाचे आणि बांधकाम प्लसटर (राजमिस्त्री) चे काम केले. त्यानंतर वर्ष २००७ रोजी त्यांनी जय काली कनस्ट्रकशन नावाने एक छोटी कंपनी ची स्थापना केली. आणि बांधकाम क्षेत्रात छोटी मोठी कंत्राटी कामे घेऊ लागले. वर्ष २००७ ते २००९ पर्यंत काम करत असताना त्यांचे निदर्शनात आले की सदर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मजूर कामगार व त्यांचे छोटे कंत्राटदार यांचा मोठ मोठी कंपनी आणि बिल्डर यांच्या माध्यमातून काम करून घेऊन त्यांचे आर्थिक आणि मानसिक शोषण होत असताना आढळून आले. सदर गोष्टीचे त्यांचा मनात खंत झाले, त्यानंतर त्यांनी सदर विषयाबाबत त्यांचा जवळचे माणसांबरोबर चर्चा केली, आणि काही महत्वपूर्ण व्यक्तीशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन मिळवले आणि सर्वांचे बहुमताने त्यांनी कामगारांचा हितासाठी काम करण्याचे ध्येय घेतली, आणि त्यांना शोषणातून काढण्या करीता. सकारात्मक उद्दिष्टाने छोटे कंत्राटदार आणि मजूर कामगार यांस-साठी स्वतंत्र आणि मुक्तपणे कार्य करण्याकरीता. दिनांक – ११ एप्रिल २०२२ रोजी न्यू भारतीय जनरल कामगार यूनियन ची स्थापना केली आहे.
आरोग्य, शिस्त, सेवा, सुधार, समृद्धी.
महाराष्ट्रातील नोंदणीकृत तसेच असंघटित कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे दर्जेदार कल्याणकारी योजना, कार्यक्रम व सुविधा पुरवून, जीवनमान उंचावणे. त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व मानसिक उन्नती घडविणे. तसेच शोषित पीडित कामगारास कायद्याअंतर्गत न्याय् मिळवून देणे.
अध्यक्ष – श्री.संजय बुधन प्रजापती.
उपाध्यक्ष – श्री.सुनील रामधनी प्रजापती.